World Bicycle Day: सायकल ट्रॅकवर धावणारं जग 1

World Bicycle Day: सायकल ट्रॅकवर धावणारं जग 😇🌍..!!!



मानवी इतिहासात काही शोधांनी जगाचाच चेहरा-मोहरा बदलून टाकला. त्यातलाच एक शोध होता, तो चाकाचा! चाकाच्या शोधाने माणसाला गतीमान केलं. माणसांचं विश्व धावतं झालं. दोन चाकांच्या सहाय्यावर स्वत:चाच समतोल साधत सुसाट धावता येणाऱ्या सायकलची निर्मिती हा याच प्रगतीमधला एक महत्त्वाचा टप्पा. याच सायकलच्या शोधाने विनाश्रम धावत्या वाहनाच्या शोधाला प्रेरणा मिळाली. चाकाच्या शोधापासून ते आता स्वयंचलित वाहनाच्या शोधापर्यंतचा हा प्रवास आहे. यातील सायकल हा घटक आजही मानवी जगाचे अविभाज्य अंग आहे. सायकल किंवा दुचाकी हे मानवी शक्तीद्वारे पायाने गती देऊन चालणारे एक उत्तम वाहन आहे. एका सरळ रेषेत बसविलेली दोन चाके, लोखंडी पातळ नळ्यांची त्रिकोणाकृती चौकट, बैठक, तोल सांभाळणारे व दिशा बदलणारे हँडल, गती देणारे दोन पायटे, दोन चाकांवर घर्षणाद्वारे कार्य करणारे गतिरोधक हे सामान्य सायकलचे मुख्य भाग होत. या वाहनाला आजचे प्रगत रुप प्राप्त होण्यासाठी अनेक संशोधकांचे आणि 1750 सालानंतरचे अडीचशे वर्षांतील श्रम कारणीभूत आहेत. आजही जगाच्या अनेक भागांत यांत्रिक दळणवळणाचे हे महत्त्वपूर्ण साधन आहे. (World Bicycle Day 2021 know history of bicycles sell of bicycles in India Know all about bicycles)



झूम : नव्या जमान्याच्या ‘हायटेक’ सायकल ...!
एम. डी. सिव्हर्क या फ्रेंच इसमाने 1690 साली पहिल्यांदा सायकलसदृश्य वाहन तयार केले. दोन लाकडी चाकांना दांड्यांनी जोडल्यानंतर जी रचना तयार झाली, त्यातील दांड्यावर बसून दोन्ही बाजूचे पाय जमिनीला रेटत रेटत पुढे रेमटवले जाणारे हे वाहन! यात कालांतराने आणखी भर पडत गेली. 1816 मध्ये बॅरन कार्ल वॉन ड्रेस यांनी हे वाहनाला दिशा देण्यासाठी म्हणून पुढील चाकावर एक हँडल बसवले. मात्र, सायकल रेमटवण्याची पद्धत तीच राहिली. 1840 मध्ये पुढील चाकाच्या आसाला पायाने गती देता येईल, असे पायडल बसविण्यात आले. हो! लहान मुलांच्या तीन चाकी सायकलींना सध्या जसे पायडल असते अगदी तसेच. यानंतर यात आणखी सुधारणा झाली. 1876 मध्ये एच.जे लॉसन यांनी एक साखळी वापरुन मागच्याही चाकाला गतीमान करण्याची पद्धत सुरु केली. आणि यानंतर साकार झाली ते आताच्या आधुनिक सायकलचे प्रारुप! यानंतर मग 1887 साली जॉन बॉइड डनलॉप यांनी रबरी टायरची भर घातली आणि सायकलच्या जीवात खऱ्या अर्थाने जीव आला.अर्थात दरम्यानच्या काळात सायकलच्या मॉडेल्समध्ये नानाविध प्रकारचे प्रयोग झाले. तीनचाकी सायकल, चारचाकी सायकल, कपल्ससाठीची सायकल या आणि अशा प्रकारच्या मॉडिफिकेशनच्या सायकलच्या इतिहासात पहायला मिळालेत. तिथंपासून ते आता हायब्रिड आणि हायटेक गिअर्ड सायकलपर्यंतचा इतिहास हा रंजक आहे. स्कूटर भारतात सर्वसामान्य व्हायच्या आधी भारतात सायकल हेच मध्यमवर्गीयांसाठीचे 'स्टेटस सिम्बॉल' होते. अगदी पत्र घेऊन येणाऱ्या पोस्टमनची अथवा दुध घेऊन येणाऱ्या गवळ्याची आपल्या मनातील आताची प्रतिमा देखील सायकलवरचीच असते. शोर चित्रपटामध्ये मनोज कुमार याच सायकलवरच्या फेऱ्या मारुन पैसे कमावताना दिसून येतो. गरीबाच्या सुखदुखात जीवनसाथीची भुमिका सायकलने एकेकाळी निभावली होती. सध्या लहान मुलांसाठीचे खेळणे अथवा हेल्थ कॉन्शिअस म्हणवून घेणाऱ्या लोकांचे चोचले, या प्रकारच्या दृष्टीकोणातूनच सायकला वावर दिसून येतो. सध्या वर्दळीच्या आणि धावपळीच्या जगात सायकलवाल्यांचं गाव तसं विरळचं!.......