Posts

World Bicycle Day: सायकल ट्रॅकवर धावणारं जग 1

World Bicycle Day: सायकल ट्रॅकवर धावणारं जग 😇🌍..!!! मानवी इतिहासात काही शोधांनी जगाचाच चेहरा-मोहरा बदलून टाकला. त्यातलाच एक शोध होता, तो चाकाचा! चाकाच्या शोधाने माणसाला गतीमान केलं. माणसांचं विश्व धावतं झालं. दोन चाकांच्या सहाय्यावर स्वत:चाच समतोल साधत सुसाट धावता येणाऱ्या सायकलची निर्मिती हा याच प्रगतीमधला एक महत्त्वाचा टप्पा. याच सायकलच्या शोधाने विनाश्रम धावत्या वाहनाच्या शोधाला प्रेरणा मिळाली. चाकाच्या शोधापासून ते आता स्वयंचलित वाहनाच्या शोधापर्यंतचा हा प्रवास आहे. यातील सायकल हा घटक आजही मानवी जगाचे अविभाज्य अंग आहे. सायकल किंवा दुचाकी हे मानवी शक्तीद्वारे पायाने गती देऊन चालणारे एक उत्तम वाहन आहे. एका सरळ रेषेत बसविलेली दोन चाके, लोखंडी पातळ नळ्यांची त्रिकोणाकृती चौकट, बैठक, तोल सांभाळणारे व दिशा बदलणारे हँडल, गती देणारे दोन पायटे, दोन चाकांवर घर्षणाद्वारे कार्य करणारे गतिरोधक हे सामान्य सायकलचे मुख्य भाग होत. या वाहनाला आजचे प्रगत रुप प्राप्त होण्यासाठी अनेक संशोधकांचे आणि 1750 सालानंतरचे अडीचशे वर्षांतील श्रम कारणीभूत आहेत. आजही जगाच्या अनेक भागांत यांत्रिक दळणवळणाचे हे महत...